पिंपरी: उपनगरांत इच्छुकांची आखाड पार्टी जोरात, जेवणावळीतून मतदारराजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न | पुढारी

पिंपरी: उपनगरांत इच्छुकांची आखाड पार्टी जोरात, जेवणावळीतून मतदारराजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न

पिंपळे गुरव : सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहेत. त्यातच आषाढ महिना सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी पिंपळे गुरव परिसरात आखाडच्या जेवणावळी दररोज उठत आहेत. कार्यकर्तेही विविध राजकीय पक्षांच्या आखाड पार्ट्यांना हजेरी लावत असून या वेळी जेवणावळी बरोबरच निवडणुकीच्या गप्पा गोष्टींना उधान येत असल्याचे दिसून येत आहे. निमित्त जरी आखाड पार्टीचे असले तरी इच्छुक यामाध्यमातून मतदारराजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आखाड निमित्याने पुन्हा एकदा मतदार राजाशी संवाद साधल जात आहे.

आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर अनेक नागरिकांचा भर असतो. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी एकत्र येऊन आखाड साजरा करण्याचे प्रमाण वाढत चालले असून, पिंपळे गुरव परिसरातील विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत आहे. परिसरात अनेक मांसाहारी हॉटेल प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच या भागात शहरातील विविध भागातील खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. काही हॉटेलमध्ये ‘आखाड पार्टी मेन्यु’ ठेवला आहे. गुरुवारी (दि. 28) गटारी अमावस्या असल्यामुळे मांसाहारी जेवणावळींचा जोर आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. प्रभागनिहाय स्थानिकांना किंवा जवळच्या मंडळींना प्राधान्याने जेवणच निमंत्रण दिली जात आहेत. निवडणूक तारखा सध्या अनिश्चित असल्याने उमेदवार महिन्यात एक तर कार्यक्रम आपापल्या भागात करण्याची कोणतीही कसर सोडत नाहीत.

उपनगरात पावसाच्या दणका असला तरी परिसरात गावरान मांसाहरी हॉटेलदेखील चांगले सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. सध्या मांसाहार हॉटेलमध्ये जेवणाचे बुकिंग जोरात होत असल्याचे दिसून येत आहेत. गावरान कोंबडी, मटण, चिकन रस्सा, बिर्याणी विविध पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवैय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Back to top button