पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्त्वाचा असल्याने भोर विधानसभा मतदारसंघातील रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मंगळवारी (दि.7) मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता मतदान साहित्य वाटपाला सुरुवात झाली. या वेळी कर्मचार्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. भोरमध्ये सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप करण्यात आले. या मतदान केंद्रावर लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाने कर्मचार्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या बॅकपॅकचे वितरण कचरे यांच्या हस्ते मतदान कर्मचार्यांना करण्यात आले. रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावर असलेले मतदान केंद्र असून 160 मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना केली आहे.
हेही वाचा