Kerala Horror : अन्…‘ब्रा’ काढायला सांगून विद्यार्थींनीना दिला प्रवेश; केरळमधील घृणास्पद प्रकार | पुढारी

Kerala Horror : अन्...‘ब्रा’ काढायला सांगून विद्यार्थींनीना दिला प्रवेश; केरळमधील घृणास्पद प्रकार

कोल्लम; पुढारी ऑनलाईन : केरळमधील कोल्लम शहरात रविवारी (दि.१७ जुलै) ‘नीट’ या मेडिकल (Kerala Horror) प्रवेश परीक्षेवेळी घृणास्पद प्रकारास विद्यार्थींनीना सामोर जावे लागले. हा प्रकार आणि पीडित मुलींचा अनुभव ऐकून तुमच्या देखिल पायाखाली वाळू सरकेल आणि तळपायाची आग मस्तकात जाईल. मेडिकलची प्रवेश परीक्षा (NEET Exam) देणाऱ्या मुलींना अत्यंत घाणेरड्या आणि लज्जास्पद प्रकाराला कोल्लम शहरातील एका महाविद्यालायच्या केंद्रात सामोरे जावे लागले आहे. हे अनुभव सांगताना या मुली ओक्साबोक्शी रडत होत्या. यावरुनच तुम्हाला या प्रकारचे गांभीर्य लक्षात येईल.

रविवारी देशभरात ‘नीट’ ही मेडिकलची प्रवेश प्रक्रीया पार पडली. इतर ठिकाणा प्रमाणेच केरळमधील कोल्लम शहरातील एका परीक्षा केंद्रामध्ये मुलींना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापुर्वी ‘ब्रा’ काढण्याची सक्की (Kerala Horror) करण्यात आली. हा अत्यंत लज्जास्पद अन् घृणास्पद अनुभव या परीक्षा देणाऱ्या मुली रडून सांगत होत्या. तसेच तीन तासांची ही परीक्षा देताना या मुलींना आपली छाती झाकण्यासाठी केसांचा आधार घ्यावा लागला होता.

‘नीट’ची परीक्षा देणाऱ्या एका १७ वर्षांच्या विद्यार्थींनीने सांगितले की, ‘माझ्यासाठी हा अत्यंत घृणास्पद (Kerala Horror) आणि लज्जास्पद अनुभव होता. त्यांनी मला बोलावून सांगितले की तुमचे स्कॅनिंग होणार आहे, आम्हाला वाटले की स्कॅनिंग नंतर आम्हाला जावू दिले जाईल. पण, आम्हाला दोन रांगेत विभागण्यात आले. एक रांग ब्रा ला मेटल असणाऱ्यांचा आणि दुसरी रांग ब्रा ला मेटल नसणाऱ्यांची करण्यात आली. त्यांनी मला विचारले तू मेटलचे हूक असणारे ब्रा घातले आहेस का ? मी त्यांना हो म्हणाले, यानंतर त्यांनी मला रांगेत उभा केले. मला समजत नव्हते की, माझ्या सोबत नक्की काय घडत आहे.’

त्या विद्यार्थींनीने सांगितले, ‘त्यांनी आम्हला आमच्या अंगातील ‘ब्रा’ काढायला सांगितला व टेबलावर ठेवण्यास सांगितले. सर्व ब्रा एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. आम्हाला समजत नव्हते की, परीक्षेनंतर आम्ही जेव्हा परत जावू तेव्हा आम्हाला आमचा ब्रा परत मिळेल की नाही? जेव्हा आम्ही परीक्षा देऊन बाहेर आलो तेव्हा त्या टेबल जवळ गर्दी जमली होती आणि आपले ब्रा घेण्यासाठी झटापट सुरु होती. कशीबशी मी त्या गर्दीतून माझे ब्रा घेऊ शकले. यावेळी अनेकजणींना रडू कोसळले. यावेळी तेथील महिला सुरक्षा कर्मचारी म्हणाली, ‘तुम्ही का रडत आहात, गप्प आपापले ब्रा उचला आणि पुढे चला’ त्या मुलीने सांगितले की, ती महिला कर्मचारी सर्व मुलींना म्हणाली ‘ते ब्रा घ्या आणि येथून चालायला लागा, त्यांना घालायची गरज नाही’ हे ऐकून आम्हाला अत्यंत अपमानास्पद आणि लज्जास्पद वाटले. शेवटी आम्ही चेंज करुनच बाहेर पडलो व यासाठी आम्ही अंधार होण्याची वाट पाहिली. जेणे करुन अंधारात आम्हाला चेंज करता येईल. हा अत्यंत घृणास्पद अनुभव होता.’

ती पीडित मुलगी म्हणाली, हा अत्यंत भयानक अनुभव होता, जेव्हा आम्ही परीक्षा देत होतो तेव्हा आम्हाला आमची छाती झाकण्यासाठी केसांचा आधार घ्यावा लागला. कारण आमच्याकडे ओढणी किंवा शॉल नव्हती. आमच्या सोबत बाजूला परीक्षार्थी म्हणून मुली आणि मुले देखिल होते. तेव्हा आम्हाला अत्यंत लज्जास्पद वाटत होते.

हा एकूणच सर्व वाद सोमवारी माध्यमांसमोर आला. जेव्हा त्या १७ वर्षांच्या मुलीने हा घडलेला प्रकार माध्यमांसमोर स्पष्ट करत परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर गंभीर आरोप केले. त्या धाडसी मुलीने माध्यमांना सांगितले की, ‘स्कॅनिंगवेळी मला माझ्या अंगातील ब्रा काढण्याची सक्ती करण्यात आली. कारण, स्कॅनिक वेळी माझ्या ब्रा ला असलेल्या मेटलमुळे आवाज आला होता.’ त्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ‘माझ्या मुलीला विना ब्रा च्या सहाय्याने तीन तासाहून अधिक काळ परीक्षेला बसताना अत्यंत वाईट अनुभवला सामोरे जावे लागले आहे.’ वडिलांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तेथे सुरक्षा करण्यास उभ्या असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी मुलींना सांगितले की, ‘तुम्हाला भविष्य महत्त्वाचे आहे, की तुमचा ब्रा ? याला काढा आणि आमचा वेळ वाया घालवू नका’.

प्रवेश परीक्षेवेळी या अपमानास्पद वागणुकीस बळी पडेलेल्यांपैकी तीन जणांची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टींग एजन्सीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण, सुरुवातीला एजन्सीने या आरोपांना फेटाळत, अशा आरोपांना काल्पनिक आणि चुकीच्या हेतुने केल्याचे म्हटले होते.

या सर्व प्रकरणाची केरळच्या महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाकडून सांगण्यात आले की, तक्रारींच्या आधारे आम्हला असे वाटते की प्राथमिक दृष्ट्या या प्रकरणात महिलांचा अपमान झाल्याचे स्पष्ट होते. आयोगाच्या अध्यक्षांनी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला या घटनेबद्दल जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Back to top button