सोलापूर : ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक; तरुण जागीच ठार | पुढारी

सोलापूर : ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक; तरुण जागीच ठार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावर खडकेवाडी फाटा येथे ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नितीन पोपट पवळ (वय ३७, रा. कुंभेज, ता. करमाळा) असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन हा बांधकाम कामगार आहे. सोमवारी तो करमाळा येथे कामावर आला होता. पावसामुळे काम लवकर आटोपून तो गावी निघाला होता. अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावरील खडकेवाडी फाटा येथे आला असता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button