चासकमान धरण ९०.७० टक्के भरले | पुढारी

चासकमान धरण ९०.७० टक्के भरले

तुषार मोढवे :  

वाडा: खेड सह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत विशेषतः भिमाशंकर अभयारण्य परिसरात सतत संतधार पडत असलेल्या पावसाने ८.५३ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ९०.७० टक्के म्हणजेच ७.८५ टिएमसी भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी सकाळी १०.३० वाजता प्रत्येकी २५ सेटिंमीटरने उघडून धरणाच्या सांडव्या ४२९५ क्युसेक वेगाने भिमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

चासकमान धरणात मध्ये ५५०० द.ल.घ.मी एवढी पाण्याची आवक होत असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मागील २४ तासांत १४ मिलिमिटर तर एकूण ५१७ मीलिमिटर मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. चासकमान धरणा मधून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणा मधून एकूण ४५०० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरणाच्या खालील बाजूस असलेला विजनिर्मीती प्रकल्प कार्यान्वित झाला असून तासाला ४ मँगावँट विज निर्मीती सुरू झाली आहे.

चासकमान धरणात शनिवारी ७५.७२ टक्के पाणी साठा होऊन खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे गुरुवार दि १४ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ३०० क्युसेक्स वेगाने सोडण्यात आले होते ते शुक्रवार दि २२ रोजी बंद करण्यात आले आहे.

धरण साखळीत सतत सूरू असलेल्या पावसाने परिसराला झोडपून काढत पुर स्थितीती निर्माण होऊन परिसरातील आरळा नदी बरोबरच भिमा नदीने ओढ्या नाल्यानी पात्र सोडले आहे. यामुळे पुलांनी धोक्याची पातळी ओलांडली असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाण्याच्या परिस्थितीवर धरणाचे कर्मचारी रात्रन दिवसभर लक्ष ठेऊन आहेत.

Back to top button