काळूसचा पूल पाण्याखाली | पुढारी

काळूसचा पूल पाण्याखाली

चाकण : पुढारी वृत्तसेवा : काळूस येथील भामा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा एका बाजूने संपर्क तुटला आहे. प्रशासनाने काळूस येथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. काळूस व भोसे या दोन गावांना जोडणारा पूल बुधवारी (दि.13 ) पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा एका बाजूचा संपर्क तुटलेला आहे.

स्थानिक तरुणांनी नदीच्या कडेला थांबून धोकादायक पद्धतीने येथून होणारी वाहतूक थांबवली. गावात येणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गाने काळूसला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काळूसमधील नागरिकांना राक्षेवाडी व वाकी या पर्यायी

Back to top button