सांगलीत एकास बेदम मारहाण | पुढारी

सांगलीत एकास बेदम मारहाण

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून बजरंग हिंदुराव दामुगडे (वय 37, रा. सुतार प्लॉट, पत्रकारनगर, सांगली) यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इजाज शेख, अजिज शेख, त्याची पत्नी, इम्तियाज शेख, कमरुद्दीन शेख व त्याची पत्नी (सर्व रा. सुतार प्लॉट, पत्रकारनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ते व दामुगडे शेजारीच राहतात. तीन वर्षापूर्वी त्यांच्यात डोळे वटारून पाहण्यावरून वाद झाला होता. हा वाद त्यांच्यात पुन्हा उफाळून आला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

संशयितांनी दामुगडे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्याचे आई व वडील भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी संशयितांनी त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर सुतार प्लॉटमध्ये तणाव निर्माण झाला होता. तेथील लोकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.

शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जखमी धायगुडे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. त्यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार कुरणे तपास करीत आहेत.

Back to top button