Bumrah’s Record : बुमराहकडून स्टुअर्ट ब्रॉडची ‘धुलाई’ अन् चंद्रकांतदांदांचे ट्वीट… | पुढारी

Bumrah's Record : बुमराहकडून स्टुअर्ट ब्रॉडची 'धुलाई' अन् चंद्रकांतदांदांचे ट्वीट...

पुढारी ऑनलाईन डेस्क : जसप्रित बुमराहने कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाचं हाती घेतल्यानंतर फलंदाजी करताना विश्वविक्रम नावावर केला आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात ३५ धावा ठोकत एकाच षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहच्या या खेळीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्‍या ट्वीटची चर्चा हाेत आहे. (Bumrah’s Record)

२००७ साली युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा षटकार लगावत एका षटकात सर्वाधिक धावा काढत विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडची भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच पद्धतीने धुलाई केली. चंद्रकांत पाटील यांनी बुमराहने केलेल्या खेळीचे वर्णन करत युवराज सिंगच्या खेळीची आठवण शेअर केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट केले आहे की, ४, ५ वाइड, ७ (नो बॉल आणि सिक्स), ४, ४, ४, ६, १… टी-२० नाही, चक्क टेस्ट मॅचमध्ये हे घडलंय. क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात महागडी ओव्हर आज इंग्लंडमध्ये टाकली गेली. युवराज सिंगनं ज्याला ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारल्या होत्या, तोच स्टुअर्ट ब्रॉड बॉलर होता आणि बॅटसमन जसप्रीत #Bumrah !  जसप्रित बुमराहच्या खेळीने युवराज सिंगच्या २००७ सालच्या खेळीची आठवण झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्‍हटलं आहे. (Bumrah’s Record)

यापूर्वी कसाेटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम ब्रायन लारा, केशव महाराज, जॉर्ज बेली यांच्या नावावर होता. विशेष म्‍हणजे या तिघांनीही एका षटकात २८ धावा केल्‍या हाेत्‍या. इंग्लंड विरूद्ध भारत या कसोटी मालिकेला गेल्या वर्षी खेळवली होती, मात्र या मालिकेतील एक सामना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. (Bumrah’s Record)

हेही वाचलंत का?

Back to top button