उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग 'एनडीए'चे उमेदवार | पुढारी

उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग 'एनडीए'चे उमेदवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ‘एनडीए’च्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे.  ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर १९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे. नुकतीच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे.  ते भारतात परतले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबमधील दिग्गज नेते आहेत. त्यांचा तळागाळारपर्यंत चांगला संपर्क आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्‍यांच्‍या सहकार्याने मदतीने भाजपचा पंजाबमध्ये १३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. कृषी सुधारणा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शीख समाज भाजपवर नाराज आहे. ही नाराजी कॅप्टनच्या मदतीने दूर करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे, अशी चर्चा पंजाबच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button