पणजी : एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुंबईला रवाना | पुढारी

पणजी : एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुंबईला रवाना

पणजी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी आमदार आज ( दि. २) रोजी कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झाले. ते बुधवार, दि. २९ रोजी रात्री गोव्यात दाखल झाले होते. पणजी जवळील दोनापावला येथील ताज कन्वेंशन सेंटर येथून हे आमदार दाबोळी विमानतळाकडे दोन बसेस मधून निघाले. यात शिवसेनेचे ३९ व त्यांचे सहकारी अपक्ष मिळून ५२ आमदार होते.

आज पहाटे चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यात दाखल झाले होते. सकाळी त्यांनी आपल्या सहकारी आमदारसोबत चर्चा केल्यानंतर ते मुंबईकडे निघाले. दुपारी बाराच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या सहकारी आमदार गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्‍हणाले, “आपलाच गट हा शिवसेना आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून निवडले होते. त्यानंतर ३९ आमदार त्यांच्यासोबत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढता येत नसल्याचेही केसरकर यांनी सांगितले

दोनापावला ते दाबोळी विमानतळ हे तीस किलोमीटर चे अंतर पार करण्यासाठी या सर्व आमदारांना कडक पोलीस बंदोबस्तात विमानतळापर्यंत नेण्यात आले. दोन बसेस मधून त्यांना नेण्यात आले. यावेळी बसच्या पुढे व मागे पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या .

हेही वाचा :

 

Back to top button