Savdav waterfall : सावडाव धबधबा प्रवाहित; पहिल्याच विकेंडला पर्यटकांची गर्दी | पुढारी

Savdav waterfall : सावडाव धबधबा प्रवाहित; पहिल्याच विकेंडला पर्यटकांची गर्दी

सिंधुदुर्ग, सावडाव (सचिन राणे) : कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधब्याचा (Savdav waterfall)  महाराष्टू शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत समावेश झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे येथील वर्षा पर्यटन बंद होते. मात्र, यावर्षी पुन्हा एकदा वर्षा पर्यटन सुरू झाल्याने पहिल्याच विकेंडला राज्यातील पर्यटकांची सावडाव धबधब्यावर उच्चांकी गर्दी झाली आहे. सावडाव परिसरात दमदार पडणाऱ्या पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी सावडावकडे पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत. वर्षा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळू लागला आहे.

कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा (Savdav waterfall) ओसंडून वाहू लागल्याने पहिल्याच विकेंडला सावडाव परिसर पर्यटकांनी बहरला आहे. डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन गर्द हिरव्या झाडाझुडपांतून धबधबा कोसळू लागला आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्याचा अनेक पर्यटक आनंद लुटताना दिसत आहे. सगळयात सुरक्षित असा हा धबधबा असल्याने येथे दरवर्षी पर्यटकांची उच्चांकी गर्दी असते.

ग्रामपंचायतीने सावडाव परिसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छतागृह अशी प्रकारची कामे केली आहेत. लोकप्रतिनिधी, शासकिय अधिकारी यांनी भेट देऊन पर्यटनासाठी सावडाव धबधबा परिसरात विविध कामांचे नियोजन केले होते. मात्र, गेली अनेक वर्षे ही कामे फक्त घोषणाच होवून राहिली आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आजही दिसत आहे. पर्यटकांची वाढ होऊनही याचा फायदा सावडाव परिसराचा विकास व रोजगाराभिमूख संधी निर्माण करण्यात झालेला नाही. यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

रॅम्प, पायऱ्या, शुशोभिकरण, स्वच्छतागृह अशा पयाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या अपुऱ्या पडत आहेत. तसेच वर्षा पर्यटन संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे. पर्यटकामुळे जिल्हयातील अनेक धबधब्यावर अनुचित प्रकार घडलेले आहेत. खबरदारी म्हणून सावडावमध्येही ही पोलीस प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून पार्कींग करही लावला जात आहे, असे उपसरपंच दत्ता काटे व ग्रामसेवक शशिकांत तांबे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button