

पिंपरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. चिंचवड गावातील चापेकर चौकात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
शिवसेना नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत. चापेकर चौकात शनिवारी शिवसैनिकांनी उद्धव यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. यावेळी अनंत कोर्हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, दीपक भोंडवे, माऊली जगताप, संतोष सौंदणकर, गोरख पाटील, प्रदीप दळवी, अमोल निकम आदी उपस्थित होते