आजचे राशिभविष्य (दिनांक १२ जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक १२ जून)

मेष – पूर्वार्ध लाभदायक. उष्णतेचे विकार शक्य. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहावे.

वृषभ- अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

मिथुन-आपले, जवळचे सहकार्य करतील. सज्जनांचा सहवास लाभेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात.

कर्क- कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका.

सिंह- मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या- प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. साहस कामाला येईल.

तूळ – दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता.

वृश्चिक – कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल. अलंकार व वस्त्रांची खरेदी कराल. मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे आनंददायी दिवस.

धनु – वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस असेल. शारीरिक श्रम होतील. कर्ज होण्याची शक्यता.

मकर – कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

कुंभ – सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. गृहसौख्य उत्तम राहील.

मीन- आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. नियमांचे पालन करावे.

Back to top button