‘प्रेम’ करण्‍याची चूक ‘तिच्‍या’ जीवावर बेतली, जन्‍मदात्‍या बापाने उचलले टोकाचे पाऊल… | पुढारी

'प्रेम' करण्‍याची चूक 'तिच्‍या' जीवावर बेतली, जन्‍मदात्‍या बापाने उचलले टोकाचे पाऊल...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ती शाळेतील मुलगी. हसणं-बांगडण्‍याच तिचे वय हाेते. प्रेम म्‍हणजे नेमकं काय असते याची समज नसणारे तिचे वय हाेतं. मात्र याचा फायदा तिची शिकवणी घेणार्‍या शिक्षकाने घेतला. ती त्‍याच्‍या आमिषाला बळी पडली आणि हेच  तिच्‍या जीववर बेतले. शिक्षकाबराेबर असणारे प्रेमसंबधाची माहिती मुलीच्‍या वडिलांना मिळाली. रागाच्‍या भरात त्‍यांनी गाेळ्या झाडून मुलीचा खून केला. ही धक्‍कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली.

पोलिसांचा संशयातून खूनाच्‍या गुन्‍ह्याचा उलगडा

28 मे रोजी बांदा जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या.पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात तिचा गोळ्या झाडून खून करण्‍यात आल्‍याचे स्पष्ट झाले. तसेच मृत मुलीचे नातेवाईक फरार हाेते. त्‍यामुळे पाेलिसांचा संशय आणखी बळावला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर धक्‍कादायक माहिती  उघडकीस आली.

प्रेमसंबंधांची माहिती मिळताच मुलीवर झाडल्‍या गाेळ्या

या प्रकरणी बांदाचे पाेलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, ” संबंधित प्रकरणातील शिक्षक हा अल्‍पवयीन मुलीच्या लहान भावंडांची ट्युशन घेण्यासाठी  तिच्या घरी येत असे. त्‍याने अल्‍पवयीन मुलीला आपल्‍या प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. घरात काेणी नसताना ताे मुलीला भेटण्‍यासाठी गेला. यावेळी मुलीचे वडील घरी आले. त्‍यांनी दाेघांना एकत्र पाहिले. संतप्‍त बापाने घरातील अवैध बंदुकीने अल्‍पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या. यामध्‍ये तिचा जागीच मृत्‍यू झाला. तरुणीचा प्रियकर आणि तिच्या वडिलांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून दाेघांना अटक करण्‍यात आली आहे”.

हेही वाचा

Back to top button