नगर जिल्ह्यात अमृत सरोवर अभियान योजनेस प्रारंभ | पुढारी

नगर जिल्ह्यात अमृत सरोवर अभियान योजनेस प्रारंभ

नगर, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशात 24 एप्रिल ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये अमृत सरोवर अभियान योजना राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ जिल्ह्यात नुकताच करण्यात आला आहे. किमान 75 अमृत सरोवर निर्मितीचे उद्दिष्टे असून अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत मृद व जलसंधारण विभाग व लघुपाटबंधारे विभागाकडील 75 पाझर तलाव दुरुस्ती कामांची निवड करण्यात आलेली आहे. यातील किमान 15 कामे 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

मृद व जलसंधारण विभागामार्फत त्यातील हंगा येथील प्रगतिपथावर असलेल्या पिंपळओढा पाझर तलाव दुरुस्तीच्या कामास बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, जलसंधारण अधिकारी ऋषिकेश चव्हाण, सरपंच जयदीप साठे, ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले व सीईओ येरेकर यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधला. कामाची आवश्यकता, गुणवत्ता व काम पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या पुनर्स्थापित पाणीसाठ्याबाबत विचारणा केली. ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

हेही वाचा:

नगरमध्ये मोबाईल व्हेटरनिटी क्लिनिक! सीईओ येरेकर; गोवंश पालकांना सेवा देण्याचा संकल्प

नगर: सेवानिवृत्तीनंतरही कचरे पुन्हा संचालक! माध्य. शिक्षक सोसायटी; निवड रद्द करण्याची विरोधकांची मागणी

नगर : पिस्तूल दाखवून अपहरण करत खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

Back to top button