कर्जत: शिवसैनिकांची अडवणूक कराल तर याद राखा; शिवसेनाप्रमुख यादवांचा इशारा | पुढारी

कर्जत: शिवसैनिकांची अडवणूक कराल तर याद राखा; शिवसेनाप्रमुख यादवांचा इशारा

कर्जत, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शिवसैनिकांची अडवणूक होत आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिलांंचे प्रश्न घेऊन येणार्‍या शिवसैनिकांची कामे अधिकार्‍यांनी करावीत, अन्यथा शासकीय कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी दिला. कर्जत येथे शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत यादव बोलत होते. अमृत लिंगडे, सुभाष जाधव, महावीर बोरा , शिवाजी नवले,भाऊसाहेब गुंड, रवी खेडकर, महेंद्र धोदाड, हरी बाबर, बबन दळवी, नाझिम काझी, अमोल सुपेकर, संजय शेलार, संदीप मोरे, पोपट धनवडे, दादा घालमे, चंद्रकांत घालमे अवि मते, पौरुष जाधव उपस्थित होते.

यादव म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत. असे असताना देखील तालुक्यात शासकीय कार्यालयांमध्ये शिवसैनिकांची अडवणूक होत आहे. यापुढील काळात कोणत्याही अधिकार्‍याची गय शिवसैनिक करणार नाहीत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते व जिल्हाप्रमुख यांच्या आदेशानुसार तालुक्यात शिवसैनिक त्यांच्या हक्कासाठी आक्रमक धोरण राबविणार आहेत.

यादव म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राज्यात सुरू केली आहे. मात्र, तालुक्यात या योजनेचा अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करीत आहेत.दोषी अधिकार्‍यांना बडतर्फे करण्याची मागणी त्यांनी केली.

Back to top button