बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम | पुढारी

बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम

पुढारी; ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरुद्ध ब्रिटनच्या सभागृहात मांडला गेलेला अविश्वास ठराव १४८ विरुद्ध २११ मते घेऊन जॉन्सन यांनी जिंकला. यामुळे ते पंतप्रधानपदी कायम राहणार आहेत. कोरोना काळातील पार्टीगेट प्रकरण आणि वाढती महागाई यामुळे ब्रिटिश जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी काही खासदारांनी केली होती.

कोरोना काळात डाउनिंग स्ट्रीट येथे असणाऱ्या पंतप्रधान कार्यालयात आयोजित पार्टीत कोरोना निर्बंध तोडल्या प्रकरणी जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी यांना दंड आकारण्यात आला होता. यावेळी त्यांच्या काही खोट्या विधांनामुळे ते ट्रोलही झाले होते. तसेच वाढत्या महागाईवर उपाययोजना करण्यासाठी त्यांचे सरकार अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षातील काही बंडखोर व इतर खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या धर्तीवर सोमवारी झालेल्या मतदानामध्ये जॉन्सन यांनी २११ मते घेऊन विजय मिळवला. यामुळे त्यांचे पतंप्रधानपद कायम राहिले असून पुढील १२ महिने तरी त्यांच्याविरुद्ध पुन्हा अविश्वास ठराव आणला जाऊ शकणार नाही.

हे वाचलंत का?

Back to top button