बोरिस जाॅन्सन म्हणाले, "पूर्वीपेक्षा ब्रिटन आणि भारतचे संबंध अधिक चांगले" | पुढारी

बोरिस जाॅन्सन म्हणाले, "पूर्वीपेक्षा ब्रिटन आणि भारतचे संबंध अधिक चांगले"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जाॅन्सन म्हणाले की, “माझं उत्तम स्वागत केले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. यापूर्वी भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये जसे संबंध होते, त्यापेक्षा अधिक चांगले संबंध आता प्रस्थापित झाले आहेत.”

गुरुवारपासून ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सस हे भारत दौऱ्यावर आहेत.  भारतीय विविध ठिकाणी त्यांचे भेटी देणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी बोरिस जाॅन्सन यांनी नुकतंट ट्विट केले होते की, “जलवायू परिवर्तन, ऊर्जा, सुरक्षा आदी क्षेत्रात दोन्ही देशांची लोकशाहीच्या दृष्टीने (भारत-ब्रिटेन) भागीदारी महत्वपूर्ण आहे.

“भारताची रशियाकडून सवलतीच्या दरात तेलाची खरेदी आणि UN मध्ये भारताचा मतदानाचा पॅटर्न, यावर विचारले असताना लंडनमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते की, “पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा हा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाही. हा दौरा बऱ्याच दिवसांपूर्वीच नियोजित होता. भारत हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण आणि हरित ऊर्जा या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आहे.”

दोन दिवसांच्या जॉन्सन यांच्या दौऱ्यात या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे. “आम्ही भारताला सल्ला देण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणून रचनात्मकपणे काम करणार आहोत. भारत आणि ब्रिटनने मुक्त व्यापार करारासाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि आज होणाऱ्या चर्चेमुळे सुरू असलेल्या वाटाघाटींना आणखी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे”, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचलंत का? 

Back to top button