SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, ९ जूनपासून टी-२० मालिका | पुढारी

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, ९ जूनपासून टी-२० मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलनंतर आता भारतीय संघ ९ जून पासून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे.  दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेसाठी आज सकाळी (दि. २ जून) भारतात दाखल झाला. भारत वि. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेला ९ जून पासून सुरूवात होईल. भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची रोज आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. या मालिकेसाठी के.एल. राहुलची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तर रिषभ पंतची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. (SA vs IND)

रोहित शर्मा, विराट कोहली यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने वेगळी ओळख निर्माण केलेल्या उमरान मलिकला भारतीय संघात संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी टेंबा बावुमा हा दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (SA vs IND)

भारतीय संघ – के.एल.राहुल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शगदीप सिंग, उमरान मलिक (SA vs IND)

 
दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन. (SA vs IND)

हेही वाचलंत का?

 

Back to top button