home loan : आजपासून मासिक हप्ता वाढणार : HDFC, PNB, ICICI या बँकांनी वाढवले व्याजदर | पुढारी

home loan : आजपासून मासिक हप्ता वाढणार : HDFC, PNB, ICICI या बँकांनी वाढवले व्याजदर

पुढारी ऑनलाईन डेस्क : HDFC, PNB आणि ICICI या मोठ्या बँकानी गृह कर्जावरील व्याजदरात  (home loan) आजपासून वाढ केलेली आहे. त्यामुळे मासिक हप्त्यात वाढ होणार आहे. HDFCने गृहकर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये तर ICICI आणि PNB या दोन बँकांनी मार्जिनल कॉस्टबेस्ड लेंडिंगमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी EMI वाढणार आहेत.

HDFCने RPLRमध्ये वाढ करण्याची ही एका महिन्यातील तिसरी वेळ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ करत हा दर ४ टक्केवरून ४.४० टक्के केला असल्याने बँकांना मिळणारे कर्ज महाग (home loan) झाले असल्याने व्याज दर वाढणे अपेक्षित होते.

HDFCने RPLR मध्ये पाच बेसिक पॉईंटने वाढवले आहे. याचाच अर्थ ३० लाखापर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर आता ७.१५ टक्के इतका होईल. तर ३० ते ७५ लाख इतक्या कर्जासाठी हा व्याजदर ७.४० टक्के इतका होईल. तर PNB ने MCLR मध्ये ०.१५ टक्के इतकी वाढ केलेली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button