शाळा सुरू होणार; पण लसीचे काय? | पुढारी

शाळा सुरू होणार; पण लसीचे काय?

वर्षा कांबळे

पिंपरी : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. आतापर्यंत शहरातील 12 ते 14 वयोगटातील 93 हजार 751 विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 296 विद्यार्थ्यांचा पहिला डोस आणि 8 हजार 777 विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. पहिली लस साधारण 23, तर दोन्ही डोस 11 टक्के विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास 16 मार्चपासून सुरुवात झाली. या मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. तसेच, 15 ते 18 वयोगटातील मुलांना 1 जानेवारीपासून कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 48 हजार 324 विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. सुरुवातीस आठ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यानंतर शाळांमध्येच मुलांचे लसीकरण करण्यात येत होते. लसीकरण सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी शाळांना सुट्या लागल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

अंमली पदार्थाची तस्करी करणारे त्रिकूट जेरबंद; गांजा कोयते, रोकड, जप्त

शहरातील शाळा दोन आठवड्यानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपला नसल्याने मुलांची काळजी घेेणे आवश्यक आहे. तसेच, शैक्षणिक वर्ष हे पावसाळ्यात सुरू होत असल्याने पावसाळ्यात विविध आजार डोके वर काढतात. यामध्ये सर्दी, खोकला व ताप या आजारांंचे रूग्ण वाढतात.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; 13 जूनपासून गजबजणार वर्गखोल्या

पालकही लसीकरण झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते. मात्र, लस आल्यानंतर लसीकरणास थंड प्रतिसाद दिसून आला आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढणार का? हा प्रश्न आहे. तसेच, अजून 1 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लस आलेली नाही. त्यामुळे या मुलांच्यादेखील आरोग्याचा प्रश्न आहे.

Back to top button