इजिप्तमध्ये ‘त्‍यांना’ सापडले १०० ममी, आता मृत्‍यूच्‍या भयाने पछाडले! | पुढारी

इजिप्तमध्ये 'त्‍यांना' सापडले १०० ममी, आता मृत्‍यूच्‍या भयाने पछाडले!

कैरो (इजिप्त); पुढारी ऑनलाईन : इजिप्त हा देश प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध. ममी आणि पुतळे (पिरॅमिड ) यामुळे हा देश जगभरात एक रहस्य बनला आहे. या देशाची राजधानी असलेल्या कैरोच्या दक्षिणेला सक्कार या ठिकाणी दगडी कॉफीन आणि ब्राँझचे पुतळे मिळाले आहेत. दगडी कॉफिनमध्ये ममी मिळाल्या आहेत. प्राचीन इजिप्तमधील प्रसिद्ध आर्किटेक्ट इमोटेफ याचा पुतळाही मिळाला आहे. हे कॉफिन आणि यातील ममी सुस्थितीत आहेत.

ममी सापडल्‍यानंतर आता ‘अवकृपा’ची भीती

इजिप्तमधील ममी शोधणाऱ्या व्यक्तीवर अवकृपा होते आणि त्यांचा मृत्यू ओढवतो, अशी जुनी समजूत इजिप्तमध्ये आहे. त्यामुळे या ममीच्या शोधामुळे एका बाजूने औत्सुक्य तर काही लोकांत भीतीचे वातावरणही निर्माण झाल्याचे ‘द सन’ या वेबसाईटने म्हटले आहे.
सक्कार ही एक मोठी दफनभूमी आहे. इजिप्तची प्राचीन राजधानी मेम्फीस या शहराची ही दफनभूमी आहे. या परिसरात १२ पेक्षा जास्त पिरॅमिड आहेत. यात काही लाडकी ममीही मिळालेल्या आहेत.

या उत्खननाचे काम पाहात असलेले प्रमुख संशोधक मुस्तफा वाजिरी म्हणाले, “चार टप्प्यात हे उत्खनन होणार आहे. आमचा मूळ उद्देश इमोटेफची कबर शोधणे हा आहे.”

ममीचा शाप

फॅरो किंवा ममीचा शाप ही कथा गेली काही शतके इजिप्तमध्ये सांगितली जाते. जो कुणी ममींची शांतात भंग करतो त्याच्यावर अवकृपा होते, असा समज आहे. इजिप्तमधील ममी शोधणाऱ्या व्यक्तीवर अवकृपा होते आणि त्यांचा मृत्यू ओढवतो, अशी जुनी समजूत इजिप्तमध्ये आहे त्‍यामुळे आता काहींना मृत्‍यूच्‍या भयाने पछाडले आहे.

ब्रिटिनमधील पुरातत्त्व विषयांचे अभ्यासक १९२२मध्ये राजा तुतनखामूनची कबर शोधली होती. लोक असे म्हणतात की, तुतनखामूनचे अवशेष हे शापित होते. या शोधानंतर योगायोगाने ही कबर शोधणारे संशोधक आणि कुटुंबीय यांचे अपघाती किंवा आजाराने निधन झाले. या घटनेनंतरही अनेक मृत्यू हे ममींच्या शोधाशी जोडले गेले होते, असे द सन या वेबसाईटने म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button