हिंगोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी

हिंगोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा महामार्गावर लिंबाळा औद्योगिक वसाहत परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. श्यामराव घुले (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी येथील श्यामराव घुले हे सोमवारी त्यांच्या दुचाकी वरून नरसी नामदेव येथे आले होते. याठिकाणी काम आटोपून ते रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास परत गावाकडे निघाले होते. त्यावेळी लिंबाळा औद्योगिक वसाहतीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात घुले यांच्या डोक्याला व हाता -पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, जमादार संतोष वाठोरे, अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button