PM Kisan : पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता मिळाला नाही?; ‘या’ नंबरवर कॉल करा | पुढारी

PM Kisan : पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता मिळाला नाही?; 'या' नंबरवर कॉल करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रातील मोदी सरकारला आज ८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शिमल्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत असल्याची घोषणा केली. मोदी यांनी ११ व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत, असे सांगितले.  दुसरीकडे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ११ व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत. तर तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पीएम किसान हेल्पडेस्कची मदत घेऊ शकता. याबाबत जाणून घेऊया –

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan) ११ व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येत नसल्यास. या संदर्भात तुम्ही तत्काळ हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करून माहिती घ्या. त्याचबरोबर तुम्ही पीएम किसानच्या टोल फ्री क्रमांक 18001155266 वर कॉल करून माहिती मिळवू शकता. तसेच तुम्ही pmkisan-ict@gov.in या मेलवरून पीएम किसान योजनेच्या ११ व्या हप्त्यासाठी पैसे न मिळाल्याचे कारण जाणून घेऊ शकता.

पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता तुमच्या खात्यात येत नसेल, तर याचे एक प्रमुख कारण म्हणजे तुम्ही ई-केवायसी केलेले नाही. सरकारने सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ३१ मे पूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. त्यामुळे पुढील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ३१ मे पूर्वी पीएम किसान योजनेसाठी तुमची ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना तुम्ही काही चूक केली असेल. तर यामुळे हप्त्याचे पैसे जमा होऊ शकत नाही. त्यासाठी पुढील हप्ते आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी चुकांची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी.

हेही वाचलंत का ? 

Back to top button