पंजाब काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या, दाेन दिवसांपूर्वीच आप सरकारने हटवली हाेती सुरक्षा | पुढारी

पंजाब काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या, दाेन दिवसांपूर्वीच आप सरकारने हटवली हाेती सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व गायक सिद्धू मुसेवाला यांची आज भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्‍यात आली. राज्‍यातील आप सरकारने सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केवळ ४८ तासांमध्‍ये ही घटना घडल्‍याने राज्‍यात खळबळ उडाली आहे.

गाेळीबारात जखमी झालेल्‍या तिघांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी सिद्धू मुसेवाला यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला हाेता, अशी माहिती मानसा हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ रणजीत राय यांनी दिली.

मानसातून विधानसभा निवडणूक लढवली

मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा ६३,३२३ मतांनी पराभव केला हाेता

काँग्रेसने व्‍यक्‍त केला शोक

काँग्रेस पक्षाने ट्विट केले की, “पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार श्री सिद्धू मूसवाला यांच्या हत्येमुळे काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांना आमच्या मनापासून संवेदना.अत्यंत दु:खद प्रसंगी आम्ही एकजुटीने आणि अविचल उभे आहोत.”

हेही वाचा

Back to top button