छत्रपती शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट देऊन दिशाभूल केली ; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप | पुढारी

छत्रपती शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट देऊन दिशाभूल केली ; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर , पुढारी वृत्तसेवा : संभाजीराजेंचा नेतृत्व विकास हा कोणासाठी चिंतेचा विषय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर छत्रपती शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट देऊन त्‍यांची दिशाभूल करण्यात आली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी नागपूरात केला आहे.

नागपूरात माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. महाराष्ट्रात छत्रपतींच्या गादीचा मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केले तरी त्यावर आम्‍ही बोलणार नाही. तर याबाबत स्वतः संभाजीराजेंनी ट्विट केले आहे, यामध्ये ते म्‍हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतोय, की मी जे बोललो ते सत्यच बोललो आहे. मला एकाच गोष्टीचे दु:ख आहे. तसेच काही लोकांनी चूकीची स्क्रिप्ट तयार करुन, आदरणीय महाराजांना माहिती दिली आहे. परंतु त्यांना हे समजत नाही की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन संभाजीराजेंना ते खोटं ठरवत आहेत. आणि महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये मतभेद आहेत, असे दाखवण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्‍यांच्या या वागण्याबद्दल मला दु:ख आहे, असेही फडणवीस म्‍हणाले.

छत्रपती संभाजीराजेंच्या कामाचा विस्‍तार गेल्‍या सहा वर्षात चांगल्याप्रकारे झाला आहे. मराठा आणि बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकीचे संबंध तयार झाले आहेत. आणि त्‍याचा सुरू असलेला विस्तार थांबवण्याचा प्रयत्‍न सुरू आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.

 संभाजीराजेंना दिले हाेते आश्वासन

केवळ रेकॉर्ड ठीक राहावे यासाठी म्हणून सांगतो की,  संभाजीराजेंची आणि माझी भेट झाली होती.  अपक्ष उमेदवार उभे राहणार असून आमच्या घराण्याची परंपरा पाहता, मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, इच्छा त्‍यांनी व्यक्‍त केली होती. आमच्या पक्षाचे यासंदर्भातील निर्णय हायकमांड घेत असते.  सर्व पक्षांनी आपल्याला समर्थन दिल्यास मी हायकमांडसोबत या संदर्भात बोलणार आहे, असे आश्वासन संभाजीराजे यांना  दिले होते, असेही फडणवीस यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा 

Back to top button