ऊर्जा बचत करणारी तरल खिडकी विकसित | पुढारी

ऊर्जा बचत करणारी तरल खिडकी विकसित

नवी दिल्ली : जगभरात सध्या अशा इमारती बांधण्यावर जोर देण्यात येत आहे की, त्यामध्ये उर्जेचा कमीत कमी वापर व्हावा. इमारतींचे डिझाईन तयार करताना इमारत तयार झाल्यानंतर प्रत्येक कोपर्‍यात प्रकाश पोहोचावा तसेच प्रत्येक भागात खेळती हवा असावी, या मुद्द्यांचा विचार केला जातो. अशा इमारती उभारल्यास संपूर्ण इमारतीमध्ये प्रकाश आणि खेळती हवा उपलब्ध होते. तसेच उर्जेचा 

वापरही कमी होताना दिसतो. दरम्यान, शास्त्रज्ञांनी अशी एक तरल खिडकी तयार केली आहे की ती बाहेरून येणारा सूर्याचा अधिकचा प्रकाश शोषून घेते. त्यानंतर या प्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करून ती उत्सर्जितही करते. 

सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही तरल खिडकी विकसित केली आहे. या शास्त्रज्ञांनी खिडकीचे   तरल पॅनेल तयार केले आहे. ते सूर्यापासून येणार्‍या ऊर्जेला रोखण्याबरोबरच तिच्यावर नियंत्रिणही मिळवते. तसेच याच ऊर्जेपासून तयार होणारी ऊर्जा रात्रीच्या सुमारास उत्सर्जित करते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास सूर्यप्रकाशामुळे मिळणार्‍या अधिकच्या उर्जेच्या मदतीने ऊर्जा तयार करून ती रात्रीच्या सुमारस वापरण्यास पुरवणारी ही तरल खिडकी आहे. रात्रीच्या सुमारासही सौर ऊर्जेपासून तयार होणार्‍या ऊर्जेचा वापर झाल्याने इलेक्ट्रिकल ऊर्जेचा वापर आपोआप कमी होता. यामुळे ऊर्जेसाठी होणारा पैशांचा खर्चही कमी होऊ लागतो. याशिवाय या खिडकीची काच अन्य काचांच्या तुलनेत 30 टक्के जास्त मजबूत आणि टिकाऊ आहे.

संबंधित बातम्या
Back to top button