मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक; जाणून घ्या पर्यायी मार्ग | पुढारी

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (दि. २९ मे) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी-वांद्रे हार्बर डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

मेगा ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच या दरम्यान होणार्‍या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button