‘विराट कोहली वडिलांच्या निधनानंतर लगेच खेळू शकतो, मग मी का नाही?’ | पुढारी

'विराट कोहली वडिलांच्या निधनानंतर लगेच खेळू शकतो, मग मी का नाही?’

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मागिल आठवड्या अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आश्चर्यकारक बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर तिने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, होणाऱ्या टीकेवर मैन सोडत विराट वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो, मग मी का नाही?’ असा उलट सवाल दिव्याने ट्रोलर्सना उपस्थित केला आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल आपल्या ग्लॅमरस फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांतच तिने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करणे काही नेटकऱ्यांना आवडलेले नाही. त्यांनी दिव्यावर जोरदार टीका केली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सातच दिवसात असे फोटोशूट करणे योग्य आहे का? असा सवाल करत तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.

ट्रोलर्सच्या या प्रश्नाला उलट प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा संदर्भ देत आपली बाजु सावरण्याचा प्रयत्न दिव्याने केला आहे. 

 ”आपण अशा एका देशात राहतोय जिथे विराट कोहली वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो. शिवाय त्याच्या खेळीचं कौतुक देखील केलं जातं. पण मी वडिलांच दु:ख विसरुन पुढे जाणाच्या प्रयत्न केला तर मात्र काही जणांना आवडत नाही. ते मला ट्रोल करतात. मी काय करावं अन् काय नाही हे माझे स्वत:चे निर्यण आहेत. मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. येत्या काळात मी रॉकेटच्या वेगाने पुढे जाणार आहे. तुम्ही मला थांबवू शकणार नाही.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत दिव्याने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Back to top button