जोकरची भीती वाटते : मौनी | पुढारी

जोकरची भीती वाटते : मौनी

कुणाला कशाची भीती वाटेल, कशाचा फोबिया असेल हे काही सांगता येत नाही. आता ‘नागिण’ मौनी रॉयने एका मुलाखतीत म्हटले आहे की तिला लहानपणापासूनच जोकरची भीती वाटते. (तिने राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ किंवा शाहरूखची ‘सर्कस’ मालिका पाहिली नसेल का?) सध्या मौनी एका रिअ‍ॅलिटी शोची जज बनली आहे.

त्यामध्ये अकरा वर्षांच्या मुलीने जोकर बनून ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं’ या गाण्यावर नृत्य केले. ते पाहिल्यावर मौनीने सांगितले की तिच्या या नृत्याने मला खरोखरच भीती वाटली. खूप लोकांना याची माहिती नाही; पण मला लहानपणापासूनच विदुषकांची भीती वाटते! मी एका लहान गावातून आले आहे आणि जत्रेत रंगीबेरंगी चेहर्‍यांचे लोक पाहून मी घाबरत असे. अर्थात मौनीने या मुलीच्या परफॉर्मन्सचे कौतुकही केले.

Back to top button