Qutub Minar : पुरातत्त्व खाते करणार कुतुबमिनार परिसरात खोदकाम, ‘विष्णूस्तंभ’ असे नामकरण करण्याची झाली होती मागणी | पुढारी

Qutub Minar : पुरातत्त्व खाते करणार कुतुबमिनार परिसरात खोदकाम, ‘विष्णूस्तंभ’ असे नामकरण करण्याची झाली होती मागणी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता दिल्लीतील कुतुबमिनारवरून  (Qutub Minar) राळ उडू लागली आहे. दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने या परिसराच्या खोदकामाचे आदेश पुरातत्त्व खात्याला (एएसआय) दिले आहेत. अलीकडेच हिंदुत्ववादी संघटनांनी कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ असे करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.

कुतुबमिनार परिसराचे खोदकाम करून या भागाचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुतुबमिनारबाबत  (Qutub Minar) अनेक दावे आणि प्रतिदावे आहेत. आक्रमककर्त्यांनी २७ हिंदू व जैन मंदिरांची तोडफोड करून कुतुबमिनार बांधल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. तशा उल्लेखाचा एक फलकदेखील या भागात आहे. दुसरीकडे पुरातत्त्व खात्याच्या एका अधिकाऱ्याने अलीकडेच आचार्य वराहमिहिर यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर बांधण्यात आल्याचा दावा केला होता. कुव्वत-उल-इस्लाम मशिदीवरूनही वाद आहे.

कुतुबमिनार परिसरातील मूर्तींची लवकरच इन्कोग्राफी केली जाणार आहे. यानंतर एएसआय आपला अहवाल सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला सोपवेल. कुतुबमिनारच्या दक्षिणेला तसेच मशिदीपासून १५ मीटर अंतरावर लवकरच खोदकाम सुरु केले जाणार आहे. याशिवाय अनंगताल आणि लालकोट किल्ल्यावर खोदकाम होणार आहे. कुव्वत-उल-इस्लाम मशिदीवर लावण्यात आलेल्या हिंदू मूर्तींची माहिती देण्यासाठी नोटीस बोर्ड लावला जाणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button