दिल्लीमध्ये यापुढे एकच महापालिका, केंद्राचा निर्णय आला अस्तित्वात | पुढारी

दिल्लीमध्ये यापुढे एकच महापालिका, केंद्राचा निर्णय आला अस्तित्वात

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा 
देशाची राजधानी दिल्लीतील तीन महापालिकांचे अखेर विलीनीकरण झाले असून, रविवारपासून (दि.२२) एकच महापालिका अस्तित्वात आली आहे. याआधी दिल्लीत दक्षिण, उत्तर आणि पूर्व दिल्ली अशा तीन महापालिका कार्यरत होत्या. एकत्रित झालेल्या महापालिकेला आता ‘म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली’ या नावाने ओळखले जाणार आहे.

दिल्ली महापालिकेचे विशेष अधिकारी म्हणून केंद्र सरकारने अलीकडेच अश्विनी कुमार यांची नियुक्ती केली होती. तीन महापालिका संपवून त्याजागी एकच महापालिका अस्तित्वात आणण्याच्या निर्णयाला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला संसदेने मंजुरी दिली होती. तत्कालीन शीला दीक्षित यांच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २०११ साली दिल्लीतील एका महापालिकेचे तीन महापालिकांत विभाजन करण्यात आले होते.

तीन महापालिकांमध्ये मागील काही वर्षांपासून भाजपची सत्ता होती. या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच, केंद्र सरकारने पुन्हा एकदा तीनऐवजी एक महापालिका अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेतला होता. तो रविवारपासून (दि.२२) अस्तित्वात येत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button