पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वात मोठा चित्रपट महोत्सव अशी ओळख असणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल ( Cannes) सुरू झाला आहे. यावर जगभरातील चित्रपट रसिकांच्या नजरा खिळल्या आहेत. लोकांमध्ये या उत्सुकतेचे प्रमुख कारण म्हणजे फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांसह रेड कार्पेटवर थिरकणाऱ्या सेलिब्रिटींचा लूक. या सेलिब्रिटींमध्ये आपल्या अनेक भारतीय अभिनेत्रींचाही समावेश आहे. कान्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सौंदर्याने थक्क करणाऱ्या दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, हिना खान यांनी तिसऱ्या दिवशीही आपली चमक दाखवली. यानंतर प्रियांका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्रा (meera chopra)ने ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओजच्या आगामी 'सफेद' या चित्रपटाची पहिली झलक कान्समध्ये दाखविण्यात आली. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार 'कान्स' च्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने धमाकेदार एन्ट्री केली. या चित्रपटातून मीरा पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
यावेळी तीने फिकट गुलाबी रंगाच्या शिमरी ड्रेसमधील लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. केसांच्या पोनीसोबत मेकअपने तिचे अप्रतिम सौंदर्य दिसत आहे. तिचा स्टाईलने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावत आहे. हे पोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीरासोबत अभिनेता अभय वर्मा, दिग्दर्शक-लेखक संदीप सिंग, निर्माते विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता हेही सहभागी झाले होते. 'सफेद' चित्रपटाचे संदीप सिंग यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विनोद भानुशाली आणि अजय हरिनाथ सिंग यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.
एका मुलाखतीत मीराने कान्समध्ये पदार्पण केल्याबद्दल खूपच आनंद झाल्याचे सांगितले आहे. याच दरम्यान मीराचा आणखी एक सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील लूक आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला आहे. याशिवाय मीरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने अनेक हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचलंत का?