नाशिक : ईलेक्ट्रिक मोटरचा शाॅक लागल्याने महिलेचा मृत्यू

सुनिता गौतम पगारे www.pudhari.news
सुनिता गौतम पगारे www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा : 

पाण्याची ईलेक्ट्रिक मोटर लावण्यासाठी प्लग चालू  करत असताना महिलेला शाॅक लागून ती जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी, दि.21 रोजी घडली आहे. या घटनेबाबत सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरात शनिवारी, दि. 21 व रविवार, दि. 22 रोजी पाणी येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. तरीही घरातील नळाला पाणी आल्याने पाणी भरून ठेवण्यासाठी लगबगीने सुनिता गौतम पगारे (४०, रा. महादेवनगर सातपूर) यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांना आर्थिंग वायरचा अंदाज लक्षात न आल्याने विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी पगार यांनी पगारे यांना मयत घोषीत केले. सदर घटनेबाबत सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सातपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनिता यांच्या पश्चात पती गौतम पगारे, दोन मुले, तिन मुली असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोलिस नाईक बेंडकुळे करत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news