विद्यार्थाना मोठा दिलासा: दप्तर होणार हलके अडीच किलोंनी | पुढारी

विद्यार्थाना मोठा दिलासा: दप्तर होणार हलके अडीच किलोंनी

सुवर्णा चव्हाण

पुणे : सध्या पहिली ते चौथीच्या दप्तराचे वजन अंदाजे 4 ते 5 किलो असून, नव्या शैक्षणिक वर्षात केवळ एका पुस्तकावर पहिल्या तिमाहीचे शिक्षण दिले जाणार असल्याच्या निर्णयामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे आता दोन ते अडीच किलोंनी कमी होणार आहे.

सातारा : बामणोली येथील जवान शहीद; ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते सैन्यदलात

शालेय शिक्षण विभागाने जूनपासून सुरू होणार्‍या नव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना केवळ एका पुस्तकावर पहिल्या तिमाहीचे शिक्षण दिले जाईल, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शिक्षणतज्ज्ञांसह शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे. याच पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.

महापालिकेच्या प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ’पहिली ते चौथीच्या मुलांची पुस्तकांची संख्या वाढवली, तर निश्चितच त्यांच्या दप्तराचे ओझे वाढते. रोज तेवढे दप्तर शाळेत आणणे कठीण होते.  या  निर्णयामुळे निश्चितच दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. शासन निर्णय अंमलबजावणी करण्यात येईल.

नवाब मलिक डी-गँगचे सदस्य; किरीट सोमय्यांचा आरोप

निवृत्त शिक्षिका सुरेखा जोशी म्हणाल्या, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे ही नेहमीच डोकेदुखी राहिलेली आहे. आता एक पुस्तक असेल तर ते खूप फायदेशीर ठरेल.

इयत्ता विद्यार्थ्यांचे वजन दप्तराचे अपेक्षित वजन
पहिली 20.1 किलो 2 किलो 10 ग्रॅम
दुसरी 22.35 किलो 2 किलो 235 ग्रॅम
तिसरी 25.05 किलो 2 किलो 505 ग्रॅम
चौथी 28.03 किलो 2 किलो 830 ग्रॅम

नव्या धोरणामुळे कमी होणारे दप्तरांचे सरासरी वजन
सध्या पहिली ते चौथीच्या दप्तराचे वजन अंदाजे 4 ते 5 किलो आहे.

पहिली – 2 किलो 90 ग्रॅम
दुसरी – 2 किलो  765 ग्रॅम
तिसरी – 2 किलो 495 ग्रॅम
चौथी – 2 किलो 17 ग्रॅम

आता दप्तरात असलेली पुस्तके

पहिली  भाषा, गणित, खेळ खेळू, इंग्रजी एकूण 4 पुस्तके
दुसरी भाषा, गणित, खेळ खेळू, इंग्रजी एकूण 4 पुस्तके
तसरी  भाषा, गणित, इंग्रजी, परिसर,  खेळ खेळू एकूण 5 पुस्तके
चौथी  भाषा, गणित, इंग्रजी, परिसर, खेळ खेळू एकूण 5 पुस्तके

मुलांच्या दप्तराचे वजन हे आपल्याकडे जुने दुखणे आहे. त्यावर अनेक वेळा उपाय झाले.  नव्या शैक्षणिक वर्षात केवळ एका पुस्तकावर पहिल्या तिमाहीचे शिक्षण देण्याचा निर्णय हा त्यावर एक उपाय सरकारने शोधला आहे.  आपल्याकडे सर्वच पुस्तके शिक्षक मुलांना आणायला सांगतात, ही शिक्षणातली चूक आहे. पण पुस्तकांचे वजन कमी केल्यामुळे दप्तराचे वजन कमी होईल हे नक्की. केवळ पुस्तकांमुळे दप्तराचे वजन वाढते याच्याशी मी सहमत नाही. पालक मुलांना पाण्याची बाटली, डबा, रुमाल असे अनेक साहित्य देतात. त्यामुळे दप्तराचे वजन वाढते. पालकांनीही दप्तराचे वजन कमी करण्याच्या दृष्टीने विचार करावा.
                                                                        – डॉ. अ. ल. देशमुख

 

Back to top button