भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही : हार्दिक पटेल | पुढारी

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही : हार्दिक पटेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पटेल कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. हार्दिक पटेल यांनी सध्यातरी मी भाजप किंवा आपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.

मी जनतेचे हित पाहून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत निर्णय घेईन, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. ते अहमदाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले असले तरीही त्यांनी अयोध्या निकाल आणि ३७० कलम या मुद्यांवर भाजपचे कौतुकही केले आहे.

हार्दिक पटेल यांनी राजीनामा देताना काँग्रेस पक्षाकडे दूरदृष्टी नसल्याचे तसेच काँग्रेस पक्ष अदानी आणि अंबानी यांसारख्या गुजराती लोकांच्या विरोधात असल्याचा आरोपही केला. हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असे म्हटले असले तरीही त्यांनी भाजपचे अनेक मुद्यांवरून कौतुकही केले आहे. त्यामुळे हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button