पुणे : ‘मसाप’ची विशेष पारितोषिके जाहीर | पुढारी

पुणे : ‘मसाप’ची विशेष पारितोषिके जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर करण्यात आली.
26 मे रोजी सकाळी 10 वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

CBI raid on Chidambaram : कार्ति चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर सीबीआयचे छापे, तीन राज्‍यांमध्‍ये कारवाई

जयवंत महाराज बोधले (शं. दा. पेंडसे पारितोषिक), डॉ. लीला गोविलकर (श्रीपाद जोशी पारितोषिक), प्रा. विश्वास वसेकर (भा. रा. तांबे पारितोषिक), संजीवनी बोकील (ना. घ. देशपांडे पारितोषिक), परेश प्रभू (रा. अ. कुंभोजकर पारितोषिक), दीपा गोवारीकर (ग. ह. पाटील पारितोषिक), दिग्विजय वैद्य आणि माधवी नानल (कृष्णराव फुलंब्रीकर पारितोषिक), डॉ. आनंद जोशी (गो. रा. परांजपे पारितोषिक), प्रल्हाद कुडतरकर (कमलाकर सारंग पारितोषिक), माधवी घारपुरे (ज्योत्स्ना देवधर पारितोषिक), श्रीराम पचिंद्रे (प्रभाकर संत व आशा संत पारितोषिक), संगीता पुराणिक आणि लीला शिंदे (शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पारितोषिक), शेखर देशमुख (कमलताई आणि केशवराव विचारे पारितोषिक), डॉ. सरिता सोमाणी-दरक (ताईसाहेब कदम पारितोषिक) यांना विशेष ग्रंथकार पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात ATS ची मोठी कारवाई, चारजणांना अटक

भानू काळे, प्रवीण टोकेकर, अभिराम भडकमकर, डॉ. अंजली सोमण, मिलिंद ढेरे, प्रा. व. बा. बोधे, नंदू मुलमुले, मनोहर सोनवणे, डॉ. अशोक इंगळे, संपत मोरे, प्रा. संजय ठिगळे, रवी आमले आणि अनुपमा उजगरे, डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, जबीन शेख, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. भारती सुदामे, अशोक कौतिक कोळी, अशोक लिंबेकर, डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, मेधा कुलकर्णी, डॉ. नारायण शिंगटे, अक्षय शिंपी, एकनाथ आव्हाड आदींना वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर झाली आहेत.

Back to top button