CBI raid on Chidambaram : कार्ति चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर सीबीआयचे छापे, तीन राज्‍यांमध्‍ये कारवाई | पुढारी

CBI raid on Chidambaram : कार्ति चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर सीबीआयचे छापे, तीन राज्‍यांमध्‍ये कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर आज सीबीआयने छापे टाकले. दिल्‍ली, मुंबई आणि तामिळनाडूमध्‍ये एकाचवेळी सीबीआयने ही कारवाई केली.

आज सकाळी सीबीआयच्‍या पथकांनी कार्ति चिदंबरम यांच्‍या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या कारवाईनंतर कार्ति यांनी ट्‍विीट केले की,  “या पूर्वीही कितीतरी वेळा अशी कारवाई झाली आहे. कारवाई कितीवेळा झाली याची आकडेवारीच मी विसरलो आहे. या छापेमारेची नोंद होणे आवश्‍यक आहे.”

कार्ति चिदंबरम यांनी एअरसेल-मॅक्‍सिस करार आणि विदेशी गुंतवणूक सवंधर्न बोर्डव्‍दारे आयएनएक्‍स मीडियाला ३०५ कोटी रुपयांच्‍या गुंतवणुकीला मंजूर मिळाली होती.  कार्ति चिदंबरम यांचे वडील पी. चिदंबरम हे २००७ मध्‍ये केंद्रीय अर्थमंत्री असताना आयएनएक्‍स मीडियामध्‍ये विदेशी गुंतवणूकीसाठी परवानगी मिळाली हाेती.  मर्यादेपेक्षा जास्‍त विदेश गुंतवणूक झाल्‍याने याची चौकशी झाली. यामध्‍ये या गुंतवणुकीला देण्‍यात आल्‍या परवानगी बेकायदेशीर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. याप्रकरणी आयएनएक्‍स मीडियाच्‍या प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांची सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) चौकशी केली होती. यानंतर चिदंबरम पिता-पुत्रांचे नाव समोर आले. याप्रकरणी कार्ति चिदंबरम यांनी लाच मागितल्‍याचा आरोप आहे. यापूर्वी सीबीआयने चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर छापे मारले होते. तसेच कार्ति चिदंबरम यांची चौकशीही केली आहे. २०१८ मध्‍ये सीबीआयने कार्ति चिदंबरम यांना अटकही केली होती. यानंतर त्‍यांची जामिनावर सुटका झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button