पाकच्या ‘त्या’ कृत्यामुळे रोमचे थिएटर झाले ‘लाल’ | पुढारी

पाकच्या ‘त्या’ कृत्यामुळे रोमचे थिएटर झाले ‘लाल’

रोम : पुढारी ऑनलाईन

रोममधील ऐतिहासिक कलोसियम हे खुले थिएटर शनिवारी रात्री लाल रंगाने उजळवण्यात आले होते. हा लाल रंग कोणत्याही उत्सवासाठी नाही तर पाकिस्तानच्या एका कायद्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी देण्यात आला होता. 

पाकिस्तानमध्ये ‘ईशनिंदा’या कायद्या अंतर्गत एका महिलेला फाशीची शिक्षा सुणावण्यात आली आहे. या महिलेच्या पतीने तिच्या बचावसाठी रोममधील एका सामाजिक संघटनेकडे याचना केली. या समुहाने पाकिस्तानमधील या कायद्याचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी रोममधील नागरिक या महिलेला मदत करण्यासाठी आणि या कायद्याच्या निषेधार्त या वस्तूसंग्रहालयाच्या बाहेर जमा झाले होते. 

इस्लाम विरोधी भाष्य केल्याच्या आरोपावरून ईशनिंदा कायद्याअंतर्गत एसिया बिबी या महिलेला २०१० फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या महिलेचा पती आशिक मसिह याने रोममधील एका संघटनेकडे मदत मागितली. या संघटनेला आशिक मसिह व त्याच्या मुलीने सर्व हकिकत सांगितली. ‘माझी पत्नी निर्दोष आहे. ईसाइ लोकांविरूद्ध असलेल्या घृणेमुळेच माझ्या पत्नीला शिक्षा सुनावण्यात आली आहे’, असे त्याने सांगितले. एसिया बीबीच्या कुटुंबाने रोमच्या पोप यांची देखील भेट घेतली आहे. 

एसिया बीबीने अनेकवेळा बचावासाठी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला पण, तिच्या पदरी अपयशच आले. तिच्या विरुद्ध इस्लामविरोधात आणि मोहम्मद पैगंबर यांची निंदा केल्याचा आरोप आहे. 

काय आहे ईशनिंदा कायदा 

कोणत्याही व्यक्तीने इस्लाम अथवा पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात बोलण्यास बंदी आहे. तसे केल्यास त्या व्यक्तीला या कायद्याअंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुणावण्यात येते. फाशीची शिक्षा देता येत नसल्यास त्याला अजिवन कारावास आणि दंडाची शिक्षा देण्यात येते. ईशनिंदा कायदा हा अनेक नागरिकांसाठी धोकादायक आणि नुकसानकारक ठरत असल्याचे पाकिस्तानी नागरिकांचे म्हणणे आहे. 
 

Back to top button