शेरॉन स्टोन Basic Instinct : ‘त्या’ सीनसाठी अंडरवेअर काढली, पण दिग्दर्शनकाने शब्द फिरवला | पुढारी

शेरॉन स्टोन Basic Instinct : ‘त्या’ सीनसाठी अंडरवेअर काढली, पण दिग्दर्शनकाने शब्द फिरवला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी-कधी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अशा बातम्या समोर येतात, जे ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. विशेषकरून जेव्हा ही बाब हॉलिवूडची असेल तर अशा घटना अधिक घडतात. चित्रपटाच्या सेटवर अनेकदा असे होते की आणि आरोप केले जातात की, चित्रपटांच्या सेटवर धोक्याने इंटिमेट सीन शूट केला जातो आणि ही गोष्ट सेलेब्सना नंतर समजते. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शेरन स्टोनने तिच्यासोबत घडलेला प्रसंगाचा खुलासा केला आहे. 

वाचा- ओ माय गॉड! शनाया कपूरचा असा लूक याआधी पाहिला नसेल 

पोलीस स्टेशनमध्ये काही अधिकारी समोर बसलेले आहेत. ते कॅथरिन (शेरॉन स्टोन) ट्रामेलची चौकशी करत आहेत. कॅथरीनने तंग कपडे परिधान केलेले आहे. पाय मांड्यापर्यंत उघडे राहतील, असा हा ड्रेस आहे. कॅथरीन पायावर पाय ठेऊन खुर्चीत बसलेली आहे. चौकशी सुरू असतानाच ती पायांची पोझिशन बदलते. हॉलिवूड चित्रपटातील आजपर्यंतचे जे काही आजरामर सीन आहेत, त्यातील हा एक सीन.

Sharon Stone shows off her famous legs at age 62 | MARCA in English

वाचा – Money Heist 5 : प्रोफेसरचा होणार का मृत्यू ? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

शेरॉन स्टोन या चित्रपटानंतर हॉलिवडूची सम्राज्ञी बनली. आजही अनेकांना ही सीन नक्कीच आठवत असेल. पण, या सीनबद्दल धक्कादायक खुलासा शेरॉन स्टोन हिने केला आहे. जवळपास २९ वर्षानंतर हा खुलासा तिच्याकडून झालेला आहे. यामुळे हॉलिवूड जगतात नवी चर्चा सुरू झालेली आहे. 

शेरॉनने १९९२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘बेसिक इंस्टिंक्ट’विषयी गंभीर खुलासा केला आहे. ‘बेसिक इंस्टिंक्ट’तो चित्रपट होता, ज्या चित्रपटातून शेरॉन स्टोन सुपरस्टार झाली होती. या चित्रपटासाठी तिला अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागला होता. 

या सीन दिग्दर्शकाने ट्रीक करून शूट करण्यात आल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, “या सीनचं शूटिंग सुरू असताना मी पांढऱ्या रंगाचे अंडरगार्मेंट घातले होते. पण त्यामुळे रिफ्लेक्शन येत असल्याची तक्रार कॅमेरामनने केली होती. दिग्दर्शकाने मला या सीनच्या शूटिंगसाठी अंडरवेअर काढून ठेवण्यासाठी सांगितले. तसेच चित्रपटात हे दृश्य घेताना एडिट करून घेऊ जेणेकरून प्रायव्हेट पार्ट दिसणार नाहीत, याची काळजी घेऊ. असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र एडिट करताना माझे प्रायव्हेट पार्ट बर्‍याच अंशी दाखवण्यात आले.”

काही वकील आणि चित्रपट वितरकांसाठी स्क्रिनिंग सुरू असताना हा प्रकार माझ्या लक्षात आले. या स्क्रिनिंग वेळी मी तडक उठले आणि दिग्दर्शन पॉलच्या कानखाली लागवली. जर माझी समंती नसेल, तर हे सीन चित्रपटात ठेवले जाऊ शकत नाहीत, असा सल्ला मला वकिलांनी दिला, असं ती सांगते. “पण मी यावर शांतपणे विचार केला. हा सीन या पात्राची गरज असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी हा सीन सिनेमात राहू देण्याचा सल्ला दिला,” असं ही तिने म्‍हटलं आहे. 

ब्युटी ऑफ लिव्हिंग ट्वाईस, या नावाने शेरॉन स्टोनचे चरित्र प्रसिद्ध होत आहे. यातील काही भाग एका इंग्रजी मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात हे संदर्भ आले आहेत. 

Back to top button