चीनचा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप: ट्रम्प  | पुढारी

चीनचा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप: ट्रम्प 

न्यू यॉर्क (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरू असतानाच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेत होणाऱ्या आगामी मध्यावधी निवडणुकीमध्ये चीन हस्तक्षेप करत आहे. या देशाला मी पुन्हा जिंकलेला नको आहे, असा आरोप ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत जगभरातील नेत्यांना संबोधित करताना केला.  

आपण चीनला व्यापारी पातळीवर आव्हान देणारा पहिला राष्ट्राध्यक्ष आहे. यामुळेच चीनला मी पुन्हा जिंकू नये, अशी चीनची इच्छा आहे. यासाठी चीन अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे आढळून आले आहे, असा गौप्यस्फोट ट्रम्प यांनी केला आहे.

इराणविषयी बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत हा देश अणुबॉम्ब बनविण्यापासून मागे हटणार नाही; तोपर्यंत त्यांच्यावर निर्बंध लागू राहतील.

यावेळी ट्रम्प यांनी शांततापूर्व भविष्यासाठी आपले प्रशासन वचनबद्ध असल्याचेही सांगितले. 

दरम्यान, महासभेत संबोधित करण्यापूर्वी ट्रम्प उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना भेटले. किम जोंग उन यांना आता शांतता हवी आहे, ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 

Back to top button