हस्तमैथुनाने वीर्यनाश होतो का? | पुढारी | पुढारी

हस्तमैथुनाने वीर्यनाश होतो का? | पुढारी

पुढारी ऑनलाईन डेस्क

सेक्स हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. त्याच बरोबर हस्तमैथुन हाही एक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं लैगिक समस्या तज्ज्ञ सांगत असतात. मात्र, हस्तमैथुन केल्याने विर्यनाश होतो असा एक गैर समज पसरवला जातो. याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

डॉ. राहुल पाटील सांगतात की, वीर्यनाश तर कोणत्याच क्रियेने होत नाही. वीर्यनाश होतो हा निव्वळ गैरसमज आहे. त्याने कोणती ताकद कमी होत नसते. वयात आल्यावर वाढलेली वासना शमवण्यासाठी सेक्स आणि हस्तमैथुन हे दोन पर्याय आहेत. वीर्य पडल्यावर वासना शमल्याने आनंद मिळतो. सेक्स केल्याने पण आनंद मिळतो. हस्तमैथुनच्या तुलनेत सेक्स केल्याने जास्त सुख मिळते. कारण दुसरे शरीर, स्पर्शसुख जास्त असते. ज्यांना जास्त सेक्ससुख उपलब्ध असते त्यांच्यात हस्तमैथुन प्रमाण कमी होते. सुरक्षित सेक्स करता येत नसेल तर हस्तमैथुन योग्य. निदान कोणता गुप्तरोग होण्याची भिती नसते.

डॉ. पाटील सांगतात की, पुरुष वयात आल्यापासून त्यांच्या वृषणांमध्ये पुरुषबीज, शुक्राणू (स्पर्म) तयार होऊन वीर्यपिशव्यांच्या तोंडापाशी येऊन जमतात. शरीराबाहेर टाकण्यासाठीच निसर्गाने वीर्याची निर्मिती केली आहे. वीर्य केवळ एक शुक्राणूवाहक द्राव आहे. वीर्यपिशव्यातून तो प्रोस्टेट ग्रंथीत उतरल्यावर त्यात प्रोस्टेट ग्रंथीचा स्रावही मिसळतो व शुक्राणू, वीर्यपिशव्यातील द्राव व प्रोस्टेट ग्रंथीचा स्राव या सर्वाचे मिश्रण स्खलनाच्या वेळी पुरुषाच्या लघवीच्या मार्गातून शरीराबाहेर टाकले जाते. प्रोस्टेट ग्रंथीचा स्राव हा वीर्याला पातळ करण्यासाठी असतो. त्याचमुळे शुक्राणू हे हालचाल व्यवस्थित करत गर्भाशयनलिकांमध्ये पोचतात व गर्भधारणा सुलभ होण्यास मदत होते. वीर्य पातळ असणे हा ‘दोष’ नसून गर्भधारणेसाठी ते उपयुक्त असते.

वीर्याची निर्मिती सतत होत असते. चाळिशीनंतर जेवढं कामजीवन नियमित तेवढं वीर्यप्रमाणही व्यवस्थित राहतं. वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया ही लैंगिक स्नायूंच्या (पीसी स्नायू) आकुंचनांनी घडत असते. वीर्य हे शरीराबाहेर जाण्यासाठीच असतं, हे नैसर्गिक तत्त्व न कळल्याने तरुणांच्या मनात न्यूनगंड तयार होतात, अशीही डॉ. पाटील यांनी माहिती दिली.

Back to top button