Fish Price : दहा बांगडे अडीचशे रुपये ! मासळीचे दर उतरल्याने मत्स्यप्रेमींना दिलासा | पुढारी

Fish Price : दहा बांगडे अडीचशे रुपये ! मासळीचे दर उतरल्याने मत्स्यप्रेमींना दिलासा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सासष्टीमध्ये बांगड्याची आवक वाढली आहे. 10 बांगडे सुमारे 250 रुपयांनी विकले जात आहेत. तसेच सुरमई व चणकचे दरही उतरले असल्याने मत्स्यखवय्यांना दिलासा प्राप्त झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीचे दर उतरले आहेत.

मासेमारीसाठी पोषक हवामान असल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणात होत आहे. सासष्टीत मासळीची आवक वाढल्याने मासळीचे दर घसरले आहेत. रविवारी सासष्टीत सुमारे 200 ते 250 रुपयांच्या दरात 10 बांगडे विकले गेले आहे. सुरमई 800 रुपयाला किलो दराने व चणक 900 किलो दराने विकली गेली आहे, तर पापलेट 1000 किलो दरावरून 700 रुपयांवर आलेले आहे. मासळीचे दर घसरल्याने मत्स्यखवय्यांना दिलासा प्राप्त झाला आहे. मडगावच्या घाऊक मासळी बाजारात रविवारी मासळी खरेदीसाठी भरपूर गर्दी झाली होती. व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मासळीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. या आठवड्यात चांगली मासळी सवलतीच्या दरात प्राप्त होत असल्याने ग्राहकही खूश आहे.

बांगड्यांची आवक वाढली

रविवारी पणजी मासळी बाजारात बांगड्यांची आवक वाढली. मध्यम आकाराचे बांगडे 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. काही ठिकाणी 150 रुपयांना 8 ते 8 बांगडे विकले जात होते. रविवारी सकाळी बाजारात बहुतेक ठिकाणी बांगडा मासे विकले गेले. याशिवाय लेपो, झिंगा मासांचा दर 150 रुपये प्रतिकिलो होता. बाजारात सुरमई , पोम्प्लेट, तिसरे, खेकडे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होते. रविवारी मटण 850, तर चिकन 170 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते.

Back to top button