वीरबालक : एफ. ललछंदामा | पुढारी | पुढारी

वीरबालक : एफ. ललछंदामा | पुढारी

7 मे 2017 रोजी एफ. ललछंदामा व त्याचे मित्र मिझोराममधील सर्वात मोठी नदी तवांगमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. त्यांची पाण्यात मस्ती चालली होती. पोहून परतताना त्यांचा एक मित्र ललरेमकिमा दगडावरील शेवाळावरून घसरला व नदीच्या पाण्यात बुडू लागला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या मित्राने पाण्यात उडी घेतली, मात्र तोही बुडू लागला.

एफ. ललछंदामाने लगेच पाण्यामध्ये उडी घेऊन ललरेमकिमाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने ललछंदामाच्या गळ्याला पकडल्याने त्याला श्‍वास घेता येईना. शेवटी कसेबसे त्याने ललरेमकिमाला काठावर आणले व तो दुसर्‍या मित्राला वाचवायला पाण्यात उतरला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते दोघेही वाचू शकले नाहीत. प्राणाची पर्वा न करता मित्राला वाचवणार्‍या एफ. ललछंदामाला ‘मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ देण्यात आला.

 

संबंधित बातम्या
Back to top button