Ira Khan :आमिर खानची मुलगी डिप्रेशनच्या गर्तेत; म्‍हणाली,”कधी कधी खूप रडावंही वाटतं…” | पुढारी

Ira Khan :आमिर खानची मुलगी डिप्रेशनच्या गर्तेत; म्‍हणाली,"कधी कधी खूप रडावंही वाटतं..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि गुंतागुंतांबद्दल सोशल मीडियावर स्‍पष्‍ट बोलत असते. मानसिक आरोग्याबाबत अनेकदा ती लोकांनाही जागरुक करत असते; पण तिच पुन्‍हा सध्या डिप्रेशनच्या गर्तेत गेली आहे. याविरूद्ध झुंज देत असलेल्या आयराने तिची ही समस्या चाहत्यांसमोर उघडपणे बोलून दाखवली आहे. तिने इन्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये मानसिकतेबरोबर शारीरिक त्रास होत असल्याचे तिने म्‍हटलं आहे. तसेच यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसल्याची खंत आयरा खानने व्‍यक्‍त केली आहे.मुश्किल दौर से गुज़र रहीं आमिर खान की बेटी आयरा, बताया आने लगे हैं 'एंग्ज़ाइटी अटैक'

आयराने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, तिला ‘चिंताग्रस्त झटके’ येऊ लागले आहेत. मला कधी नर्व्हस वाटतं तर कधी मी आनंदात असते. कधी कधी तर मला खूप रडावंही वाटतं. यापूर्वी मला कधीही चिंताग्रस्तेचा झटका आला नाही. ज्यापर्यंत मला समजले आहे, डिप्रेशनमध्ये मानसिक बरोबर हृद्याची धडधड वाढणे, श्वासची गती वाढणे, रडू येणे यासारखी शारीरिक लक्षणं देखील दिसतात. ही हळूहळू वाढत जातात. पॅनिक अटॅक कसा असतो हे मला माहीत देखील नव्हते; पणही खरोखरच विचित्र भावना आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, जर हे नियमित झाल्यास मला माझ्या डॉक्टर/मानसोपचारतज्ज्ञांना सांगावे लागेल.

आमिर खान की लाडली का इरा नहीं है असली नाम, खुलासा कर कहा- सही उच्चारण नहीं किया तो... | TV9 Bharatvarsh

पुढेही ती म्हणते, यामुळे मला खूपच असहाय्य वाटतंय. मला झोपायचे असते; परंतु मला झोप येत नाही. कारण हे चिंतेचे झटके थांबतच नाहीत. मी माझी भीती ओळखण्याचा प्रयत्न करते, स्वतःशी बोलतो, पण जर हा झटका एकदा येऊन आदळला की, मला हे थांबवण्याचा मार्गच सापडत नाही. पण Popeye शी बोलल्याने आणि दीर्घ श्वास घेतल्याने मला खूप आराम मिळतो, असेही तिने म्‍हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

हेही वाचलत का ?

Back to top button