Pune Accident : फरार बिल्डर विशाल अग्रवालला अखेर पुणे पोलिसांकडून अटक

Pune Accident : फरार बिल्डर विशाल अग्रवालला अखेर पुणे पोलिसांकडून अटक

पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे  कार अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांकडून संभाजीनगरमध्ये अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून अग्रवाल फरार होते. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी  पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालय काय निकाल सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागुन आहेत.

 हेही  वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news