आजचे राशिभविष्य (दि. 1 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 1 मे 2022)

मेष : मनपसंद खरेदी करण्याचा योग संभवतो. लोकांना सहकार्य कराल. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न होईल. संयमी वृत्तीमुळे मोठी कामे होतील.

वृषभ : कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्यदक्ष राहा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा.

मिथुन : लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम.

कर्क : प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. सेवाकार्य घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एकमेकांशी सल्ला मसलत करून निर्णय घ्याल.

सिंह : मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील.

कन्या : दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील. पित्ताचे विकार होण्याची शक्यता.

तूळ : गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत प्रगती होईल.

वृश्चिक : शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौतुकास्पद काम कराल. पदोन्नतीचे योग संभवतात.

धनु : मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थीवर्गासाठी नम्रता आवश्यक.

मकर : वाद-विवादामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवा. अनावश्यक खर्च उभे राहतील. कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.

कुंभ : कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस ठरेल. व्यावसायिक प्रगती होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल.

मीन : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आळस व नियोजनशून्य वृत्तीमुळे अपयश येऊ शकते.

Back to top button