‘या’ ॲपवर भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड  | पुढारी

‘या’ ॲपवर भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड 

मुंबई: पुढारी ऑनलाईन  

टेक्नो युगात काय निघेल सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीची ॲप आहे त्यात नवीन एका ॲपची भर पडली आहे. चक्क या ॲपच्या माध्यमातून भाड्याने बॉयफ्रेंड मिळणार आहे. 

या ॲपचे नाव RABF असे आहे. १५ ऑगस्टला हे ॲप मुंबईत लॉन्च झाल. या ॲपचा उपयोग मुंबईतील लोक करु शकतात. या ॲपची निर्मिती कौशल प्रकाश यांनी केली आहे. ही ॲप मानसाच्या भावनेशी जोडली गेली आहे. या ॲपची निर्मिती एकाकीपणा दूर करण्यासाठी केली आहे. आयुष्यात एखादी अडचण आपणास शेयर करायची असल्यास आपण या ॲपचा वापर करु शकतो.

 ॲपच्या एक टोल फ्री नंबर आहे. ज्याच्या माध्यमातून एकटेपणा दूर करता येतो. ही ॲप लोकांना फक्त भावनिक आधार देण्याचे काम करणार आहे. या ॲपच्या माध्यामातू सिक्स पॅक असलेला बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार नाही तर असा मित्र मिळणार आहे. ज्याच्याशी तुम्ही आपल्या सर्व गोष्टी शेयर करु शकतो. 

Back to top button