अद्भुत प्राणी : मयूर मासा | पुढारी

अद्भुत प्राणी : मयूर मासा

सेलफिशला मराठीत ‘मयूर मासा’ म्हटले जाते. या माशाच्या पाठीवरील जहाजाच्या शिडाप्रमाणे असलेल्या पंखामुळे या माशाला हे नाव मिळाले आहे. मयूर माशाचा रंग गर्द निळा किंवा करडा असतो. अटलांटिक व इंडो पॅसिफिक दोन्ही महासागरांत हा मासा आढळतो. याची लांबी चार ते पाच फूट असते. वजन सुमारे 90 किलो असते. समुद्रात सुमारे 600 फूट खोलवर हा मासा आढळतो. या माशाचा पाण्यातील वेग सुमारे 110 कि. मी. प्रतितास एवढा असतो. चमकदार निळा रंग व अनोख्या आकाराचे पंख यामुळे मयूर मासा अतिशय वेगळा दिसतो. या माशाला जगातील अनेक मत्स्यालयांकडून मागणी असते. याची मांसासाठी शिकार केली जात नाही, तर मत्स्यालयात ठेवण्यासाठी याला पकडले जाते. मयूर माशाचे सरासरी आयुष्य पाच ते सात वर्षे असते. तरीही मत्स्यालयात अगदी 15 वर्षे हा मासा जगल्याची उदाहरणे आहेत.

मासेमारांसाठी मयूर मासा जाळ्यात सापडणे ही भाग्याची गोष्ट असते. याचे कारण उत्तम प्रतीच्या पूर्ण वाढ झालेल्या मयूर माशाची किंमत हजारो रुपये असू शकते. मयूर माशाच्या चपळ गतीमुळे त्याला फारसे शत्रू नसले तरी शार्क, देवमासा इत्यादी मोठ्या आकाराचे मासे याचे प्रमुख शत्रू असतात. भारतात गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात हा मासा कधी कधी आढळतो.

संबंधित बातम्या
Back to top button