दापोली : तटरक्षक दलाची बोट तांत्रिक बिघाडामुळे किनारी | पुढारी

दापोली : तटरक्षक दलाची बोट तांत्रिक बिघाडामुळे किनारी

दापोली पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट दि. 27 रोजी किनार्‍यावर आली. बोट किनार्‍यावर लागल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, बोट तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पाळंदे समुद्र किनार्‍यावर आणण्यात आली होती. भारतीय तटरक्षक असे या बोटीवर लिहिले आहे. दरम्यान या बाबत तटरक्षक दलाचे राजा चोलन यांनी सांगितले की, ही बोट मुंबईकडे निघाली असून इंजिन बिघाड झाल्याने ती किनार्‍यावर आणण्यात आली आहे.

Back to top button